अकोल्यात गोळीबाराचा थरार; संपत्तीच्या वादातून वडिलांनी केली मुलाची गोळी झाडून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:30 PM2020-02-03T13:30:03+5:302020-02-03T14:02:41+5:30

बाबा भारती असे वडीलाचे नाव असून, त्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मुलगा मनिष भारती हा जागीच ठार झाला.

Thrill of firing at Akola; Father shot and killed his son | अकोल्यात गोळीबाराचा थरार; संपत्तीच्या वादातून वडिलांनी केली मुलाची गोळी झाडून हत्या

अकोल्यात गोळीबाराचा थरार; संपत्तीच्या वादातून वडिलांनी केली मुलाची गोळी झाडून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देवडील बाबा भारती यांनी मनीष वर गोळी झाडून त्याची हत्या केली. मनीष भारती हा त्याचे वडील बाबा भारती यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या बेतात होता. या गोळीबारात मनिष भारती यांचा जागेवरच मृत्यू झाला, असे पोलिसांकडून समजले आहे.

अकोला :  संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. ही घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडणायक अपार्टमेंटमध्ये घडली. मृतक मनीष भारती असून मारेकरी त्याचे वडील बाबा भारती आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलिस अधिकारी उपस्थित आहे. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा मुलगा राजेश भारती ही काँग्रेसचा मोठा नेता आहे.

बाबा भारती व त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा बऱ्याच वेळा वाद होत होता. या वादाने परिसीमा गाठली होती. मनिष भारती हा वडील बाबा भारती याच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर येत असल्याची दिसतात त्यांनी त्या बंदूकीतून त्याच्या छातीमध्ये एक गोळी झाडली. मुलगा मनीष हा जागीच ठार झाला. ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सिव्हील लाइन, रामदास पेठ यासोबतच शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बाबा भारती यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी सवांद साधून घटनेची तोंडी माहिती दिली. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. तर दोन दिवस आधी मनीष भारती याला तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आली होते. मनीष भारती हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. वृत्त लीहीस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

 

Web Title: Thrill of firing at Akola; Father shot and killed his son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.