अकोला : राज्यातील अनुसूचित जमातीतील आदिवासींना तत्कालीन व सत्ताधारी पक्षाच्या सरकारने आजवर केवळ आश्वासने दिली. या जमातींना आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव राज्य सरकार खेळत आहे. ही बाब लक्षात न्याय मिळण्याच्या उद्देशाने भारिप बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार अकोल्यासह राज्यभरातील ४५ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी केला असल्याची माहिती आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.कोळी महादेव, हलबा, माना, गोवारी, मन्नेवार, टोकरे कोळी, ढोर कोळी, अशा अनेक आदिवासी जमाती आदिम काळापासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. अकोला अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १ कोटी अन्यायग्रस्त आदिवासींची संख्या आहे. त्यातील कोळी महादेव जमातीसह दीड लाख आदिवासी जमातीतील लोक एकट्या अकोला जिल्ह्यात आहे. तसेच वंचित व आदिवासी समाजाचे महाराष्ट्रात ८५ मतदारसंघात प्राबल्य आहे. म्हणजेच ८२ आमदार निवडून देण्याची ताकद या आदिवासींच्या एकगठ्ठा मतांवर आहे अशी माहिती डॉ. भांडे यांनी यावेळी दिली.आजही अकोला जिल्यातील कोळी महादेव सह इतर आदिवासी घटक आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित आहे. त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे या जमातीतील कर्मचा?्यांच्या नोकº्या धोक्यात आहेत. त्यामुळे हजारो कुटुंब रस्त्यावर येणार आहेत. मात्र सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. मराठ्यांना जेवढ्या ताबडतोब आरक्षण दिले तेवढ्यात तत्काळ महाराष्ट्रातील आदिवासींचे प्रश्नही सरकारने सोडवावे अशी मागणीही डॉ. भांडे यांनी केली. अन्यथा येत्या निवडणुकीत राज्यातील ८५ मतदार संघातील आदिवासी व वंचित घटकांनी भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी आगामी काळात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीला पूर्ण जोमाने पाठिंबा देणार असल्याचेही डॉ. भांडे यांनी सांगितले.