शौचालय बांधकामात केली हयगय; तेल्हारा तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:17 AM2018-01-19T00:17:12+5:302018-01-19T00:20:02+5:30

तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात येणार्‍या शौचालयांमध्ये हयगय  केल्याप्रकरणी तेल्हार्‍यातील दोन ग्रामसेवकांवर विभागीय आयुक्तांनी निलंबनाची  कारवाई केली. 

Toilets have been constructed; Two Gramsevaks suspended in Telhara taluka! | शौचालय बांधकामात केली हयगय; तेल्हारा तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित!

शौचालय बांधकामात केली हयगय; तेल्हारा तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित!

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी केली निलंबनाची कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात येणार्‍या शौचालयांमध्ये हयगय  केल्याप्रकरणी तेल्हार्‍यातील दोन ग्रामसेवकांवर विभागीय आयुक्तांनी निलंबनाची  कारवाई केली. 
विभागीय आयुक्तांनी १८ जानेवारी रोजी तेल्हारा येथे भेट देऊन विविध  विभागांचा आढावा घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामात कुचराई  करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांनी धारेवर धरले. पेयजल व स्वच्छता मिशन  मंत्रालय यांच्या निर्देशानुसार गावे हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना आहेत. 
सन २0१८ च्या पहिल्या, दुसर्‍या महिन्यात गाव हगणदरीमुक्त करण्याचे आदेश  असताना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात हयगय करणे, तालुका-जिल्हास्तरीय  बैठकांना हजर न राहणे इत्यादी कारणावरून विभागीय आयुक्तांनी आपल्या  भेटीत अधिकारी, कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. यामध्ये सौंदळा  येथील ग्रामसेवक वाघमारे व तळेगाव खु. येथील जायले  यांच्यावर निलंबनाची  कारवाई करण्यात आली.

Web Title: Toilets have been constructed; Two Gramsevaks suspended in Telhara taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.