अकोला येथील कीर्तीनगरमधील रहिवासी फिर्यादी संजय कमलकिशोर अग्रवाल यांनी आपल्या एम.आय.डी.सी. फेज-३ जवळ कुंभारीस्थित असलेल्या आदिती इंडस्ट्रीजमधून ११ मार्चच्या दुपारी ४ वाजता ते १३ मार्चदरम्यान आयशर वाहनाचा मालक आरोपी मनोहर के. इंगळे, चालक दिलीप इंगळे, रा. शिवर, अकोला यांच्यावर विश्वास ठेवून ३० किलोप्रमाणे ३६५ तूर डाळ कट्टे माल नागपूर येथे ग्राहकांना पोहोचविण्यासाठी दिला असता आरोपी वाहनमालक मनोहर के. इंगळे, चालक दिलीप इंगळे यांनी फिर्यादी संजय अग्रवाल यांचा विश्वासघात करून नागपूरच्या एकाही ग्राहकास माल न पोहोचवता २३४ तूर डाळीचे कट्टे माल संगनमत करून ग्राम गोदामपूर स्वतःच्या घरी कुठेतरी नेवून ठेवले व उर्वरित १३१ तूर डाळीचे कट्ट्यांबाबत विश्वासघात करून फिर्यादीची फसवणूक केली.
याप्रकरणी पोलीस स्टेशन माना येथे संजय कमलकिशोर अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ४०७, ४२०, ३४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. घनश्याम पाटील, ना.पो.कॉ. नंदकिशोर टिकार, पो.कॉ. सचिन दुबे करीत आहेत.