'यास' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 12:26 PM2021-05-25T12:26:14+5:302021-05-25T12:26:45+5:30

Indian Railway News : २४ ते ३० मेदरम्यान त्या राज्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत.

Trains to West Bengal canceled due to cyclone 'Yas' | 'यास' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

'यास' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

Next

अकोला : बंगालच्या उपसागरावर घोंगावत असलेले यास चक्रीवादळ येत्या दोन दिवसात पश्चिम बंगाल राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने २४ ते ३० मेदरम्यान त्या राज्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये अकोल्याहून जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या व दोन पार्सल गाड्यांचा समावेश आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ०२२७९ पुणे-हावडा विशेष, ०२२८० हावडा-पुणे विशेष, २५ व २९ मे रोजी सुटणारी ०२८३३ अहमदाबाद-हावडा विशेष, २५ व २६ मे रोजी सुटणारी ०२८२४ हावडा-अहमदाबाद विशेष, ०२८१० हावडा-मुंबई विशेष, ०२२५९ मुंबई-हावडा विशेष, ०२२६० हावडा-मुंबई विशेष, ०२९०५ ओखा-हावडा विशेष, ०२९०६ हावडा- ओखा विशेष, ०२२५५ लोकमान्य टिळक टर्मिनस कामख्या विशेष या गाड्यांचा समावेश आहे.

पार्सल गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-शालिमार व शालिमार-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, सांगोला-शालिमार व शालिमार-सांगोला पीसीईटी या पार्सल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Trains to West Bengal canceled due to cyclone 'Yas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.