अकोला जिल्ह्यातील ठाणेदारांच्या बदल्या, अनेक वर्षांनी महिला अधिकारी ठाणेदारपदी!

By नितिन गव्हाळे | Published: July 2, 2023 12:52 PM2023-07-02T12:52:58+5:302023-07-02T12:53:49+5:30

शहरातही ठाणेदारांचा खांदेपालट करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर महिला अधिकारी सिव्हिल लाइनच्या ठाणेदारपदी विराजमान होणार आहे. 

Transfers of Police in Akola district, female officers as Thanedars after many years! | अकोला जिल्ह्यातील ठाणेदारांच्या बदल्या, अनेक वर्षांनी महिला अधिकारी ठाणेदारपदी!

अकोला जिल्ह्यातील ठाणेदारांच्या बदल्या, अनेक वर्षांनी महिला अधिकारी ठाणेदारपदी!

googlenewsNext

अकोला: अनेक दिवसांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू असताना, पोलिस अधीक्षक संदीप घुगे २ जुलै रोजी यांनी जिल्हा व शहरातील काही पोलिस निरीक्षकांसोबत सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. शहरातही ठाणेदारांचा खांदेपालट करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर महिला अधिकारी सिव्हिल लाइनच्या ठाणेदारपदी विराजमान होणार आहे. 

अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील ठाणेदारांसह सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. जिल्ह्यातील काही पोलिस निरीक्षकांच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये बदल्या झाल्या. त्यात चार पोलिस निरीक्षक इतर जिल्ह्यातून बदलीवर अकोला जिल्ह्यात आले आहेत. अकोटचे पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बदली केली आहे. वैशाली मुळे या नियंत्रण कक्षातून सिव्हिल लाइन ठाण्यात प्रभारी अधिकारी राहतील. नितीन लेव्हरकर यांची ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या जागी जुने शहरच्या ठाणेदारपदी नियुक्ती केली आहे. 

पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांना डाबकी रोड पोलिस ठाण्याची धुरा देण्यात आली आहे. चंद्रशेखर कडू यांची सिटी कोतवालीतून एमआयडीसी ठाण्यात बदली केली आहे. अनुभवी पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांच्याकडे अकोट शहराचा प्रभार देण्यात आला आहे. सचिन यादव यांची मूर्तिजापूर येथून तेल्हारा पोलिस ठाण्यात बदली केली आहे. सेवानंद वानखडे यांना दहिहांडा पोलिस ठाणे दिले आहे. तसेच सिव्हिल लाइनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांची मूर्तिजापूर पोलिस ठाण्यात बदली केली आहे. शिरीष खंडारे यांची बार्शीटाकळीला तर किशोर शेळके यांची पातूर पोलिस ठाण्यात, संजय खंदाडे यांची प्रभारी अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली आहे. विजय नाफडे यांच्याकडे सायबर सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.

हिवरखेड, पिंजर, उरळ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी एपीआयकडे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्याच्या ठाणेदार पदी एपीआय गोविंदा पांडव, पिंजरचा प्रभार एपीआय राहुलव वाघ, उरळच्या ठाणेदारपदी गोपाल ढोले, माना पोलिस ठाणे प्रभारी सुरज सुरोशे, सुरेंद्र राऊत यांची मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच एपीआय विजय चव्हाण-सिव्हिल लाइन, राहुल देवकर-खदान, अजयकुमार वाढवे-जुने शहर, किशोर वानखेडे-अकोट फैल, अनंत वडतकर- मूर्तिजापूर शहर, पंकज कांबळे-बाळापूर, विनोद घुईकर-बाळापूर एसडीपीओ रिडर, महेश गावंडे(रिडर एसपी), ज्ञानोबा फड-एलसीबी, महादेव पडघन-एसडीपीओ शहर रिडर आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

एसीबी प्रमुखपदी कैलास भगत
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांची बुलडाण्याला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल. याची चर्चा सुरू होती. काही पोलिस निरीक्षकांनी त्यासाठी फिल्डिंगसुद्धा लावली होती. परंतु अनपेक्षितपणे मानाचे ठाणेदार कैलास भगत यांची एलसीबी प्रमुखपदी वर्णी लागली आहे.
 

Web Title: Transfers of Police in Akola district, female officers as Thanedars after many years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस