चांदूर येथील युवकाला श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:04+5:302021-01-24T04:09:04+5:30

प्रभाग १८ मध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम अकाेला : प्रभाग क्रमांक १८ मधील राहतनगर येथे विवेकानंद नवदुर्गा महिला मंडळाच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे ...

Tribute to the youth of Chandur | चांदूर येथील युवकाला श्रध्दांजली

चांदूर येथील युवकाला श्रध्दांजली

Next

प्रभाग १८ मध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम

अकाेला : प्रभाग क्रमांक १८ मधील राहतनगर येथे विवेकानंद नवदुर्गा महिला मंडळाच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन शिव मंदिरात करण्यात आले हाेते. यावेळी सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, अर्चना शर्मा, सुनीता अग्रवाल, महापौर अर्चना मसने, चंदा शर्मा, जयश्री दुबे, वैशाली शेळके, गीतांजली शेगोकार आदी उपस्थित होत्या.

बालाजीनगर येथे महिला संवाद कार्यक्रम

अकाेला : राधाकृष्ण पार्क बालाजीनगर येथे श्रीराम नवमी शाेभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण संत्सग मंडळाच्यावतीने महिला संवाद व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमाला मनपातील महिला व बाल कल्याण समिती सभापती मनीषा भंसाली यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी परिसरातील असंख्य महिला सहभागी झाल्या हाेत्या.

निधी संकलनासाठी संघटना सक्रिय

अकाेला : अयाेध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर सामाजिक संघटनांच्यावतीने मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलनाला सुरुवात केली आहे. शहरात नागरिकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या जात आहेत. निधी देण्यासाठी अकाेलेकरांमध्ये उत्साह दिसत आहे.

मंगळवारी वन कामगारांचा मेळावा

अकाेला : राज्यातील वन, वनीकरण व वन विकास महामंडळमधील राेजंदारी तथा कायम वन मजुरांचा मेळावा अकाेला येथे २६ जानेवारी राेजी स्वराज्य भवन येथे आयाेजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू, आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांनाे, स्वत:कडील बियाणे वापरा!

अकाेला : आगामी खरीप हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. साेयाबीनचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खताचा वापर करावा.

पंचायत समितीसमाेर रस्ता दुरूस्ती

अकाेला: पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. आ. गाेवर्धन शर्मा यांच्या निधीतून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय रुग्णालय ते पंचायत समितीपर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत हाेते. गुरुवारी रात्रीपासून याठिकाणी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

कुत्रे पकडण्याची कारवाइ सुरू

अकाेला : शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेत माेकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे दिसून येते. तसेच गल्ली-बाेळात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. माेकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी मनपाच्या काेंडवाडा विभागाने मंगळवारपासून शहरात माेहीम सुरू केली आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना शहराबाहेर साेडले जात आहे.

हरभरा कीड; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अकाेला : रब्बी हंगामात यंदा जिल्ह्यात हरभरा पिकाची माेठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे साेयाबीन, तूर, ज्वारी, मूग, उडीद व इतर पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, हरभरा पिकातून नुकसान भरपाई निघेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असून, या पिकावर आलेल्या कीडसंदर्भात शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने मार्गदर्शन केले जात आहे.

Web Title: Tribute to the youth of Chandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.