अकोला : यशवंत सिन्हांच्या आंदोलनास आता राष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश द्विवेदी यांनी दुपारी चार वाजताचे सुमारास अकोल्यात येऊन आंदोलस्थळ गाठले. यावेळी त्यांनी यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन आंदोलनास समर्थन व्यक्त केले. द्विवेदी हे तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्या पक्षाचा या आंदोलनास पाठिंबा असल्याचे त्यांनी सिन्हा यांना सांगितले. त्यामुळे हे आंदोलन आता राष्ट्रीय पातळीवर गेले आहे. आम आदमी पार्टीच्या प्रिती मेनन यांनीही यशवंत सिन्हांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे देखील त्यांच्या सहकाºयांसह अकोल्यात येऊन यशवंत सिन्हा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.पुढील अर्धा तास महत्वाचाया आंदोलनाचा पुढील अर्धा तास महत्वाचा असून, या अर्ध्यातासात शासनाकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आंदोलनस्थळावरील सुत्रांनी व्यक्त केली आहे. मागण्यांबाबत सरकार अनुकुल असून, सकाळीच मुख्यमंत्र्यांनी यशवंत सिन्हा यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. आता थोड्याच वेळात शासनाकडून मागण्या मान्य होण्याची चिन्हे आहेत. मागण्या मान्य झाल्यास आंदोलनाची यशस्वी सांगता होईल, असे मानले जात आहे.
यशवंत सिन्हांच्या अकोल्यातील आंदोलनास तृणमुल काँग्रेसचा पाठिंबा
By atul.jaiswal | Published: December 06, 2017 4:19 PM
अकोला : यशवंत सिन्हांच्या आंदोलनास आता राष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश द्विवेदी यांनी दुपारी चार वाजताचे सुमारास अकोल्यात येऊन आंदोलस्थळ गाठले.
ठळक मुद्देआंदोलन पोहचले राष्ट्रीय पातळीवरआम आदमी पार्टीच्या प्रिती मेनन यांनीही यशवंत सिन्हांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.