यावेळी तुकारामभाऊंनी विनोद मिरगे यांना गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहा. सौंदळा गावावर माझे प्रेम असल्याने, मी सौंदळ्यासाठी निधी मागेन व विकासकामे खेचून आणा, असे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राधाताई बिडकर, सदाभाऊ शेळके होते. सरपंच विनोद मिरगे, हरिश्चंद्र अरबट, महादेवराव मिरगे, महादेवराव तोरखडे, गजानन मिरगे, पुष्पा मिरगे, लता पांडे, उषा सीत्रे, अनिता सपकाळ, प्रीती सीत्रे, अनुराधा सीत्रे, सोनू मिरगे, कल्पना मिरगे, उज्ज्वला मिरगे, प्रमोदिनी मेतकर, गालीफ भाई, पिंटू खंडेराव, सुभाष सीत्रे, तुकाराम सीत्रे, पांडुरंग मिरगे, काशिनाथ गोतमारे, शेख. बब्बु शे. हाशम, अनिल मोडक, संजय वानखेडे, गजानन काकड व गावातील नागरिक उपस्थिती होते. (वा.प्र.)
फोटो: ८ बाय ८
सौंदळा येथे पूर्णत: संचारबंदी
सौंदळा: अकोला जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी यांनी २० फेब्रुवारी सायंकाळपासून ते २२ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिल्याने सौंदळ्यात नागरिकांनी संचारबंदीला प्रतिसाद दिला. यावेळी व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली. ऑटो असोसिएशनने ऑटो बंद ठेवले. नागरिकही घराबाहेर पडले नाहीत.
सौंदळा परिसरात अवकाळी पाऊस
सौंदळा: १८ फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हरभरा पिकाचे नुकसान झाले. सोंगणी करून ठेवलेला हरभरा पावसाने भिजला असून, गहू पीकही जमिनीवर पसरले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सौंदळा, वारी, वारखेड, पिंपरखेड, कार्ला परिसरात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.