- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यात एकूण ३ लाख २१ हजार ६७३ शेतकरी असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत यापूर्वी पाच एकर मर्यादेपर्यंत शेतजमीन असणारे जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९०२ शेतकरी पात्र ठरले आहेत. आता या योजनेंतर्गत सरसकट सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ मे रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील आणखी २ लाख ५ हजार ७७१ शेतकरी ‘पीएम-किसान’ योजनेत पात्र ठरणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३ लाख २१ हजार ६७३ शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये जमा करण्यासाठी शासनाकडून वर्षाकाठी १९३ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद मिळणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी तीन टप्प्यांत प्रत्येकी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय गत १ फेबु्रवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात घेण्यात आला होता. त्यानुसार या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ३ लाख २१ हजार ६७३ शेतकºयांपैकी पाच एकरापर्यंत शेतजमीन असलेले १ लाख १५ हजार ९०२ शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी काही शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे पहिल्या व दुसºया टप्प्यातील रक्कम लोकसभा निवडणुकीपूर्वी जमा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा ३० मे रोजी शपथविधी झाल्यानंतर ३१ मे रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरसकट सर्व शेतकºयांना त्यांच्याकडील जमिनीचा विचार न करता दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षभरात तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आणखी २ लाख ५ हजार ७७१ शेतकºयांना ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुषंगाने या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये जमा करण्यासाठी वर्षाकाठी केंद्र सरकारकडून १९३ कोटी ३८ हजार रुपयांची तरतूद मिळणार आहे.जिल्ह्यात यापूर्वी पात्र ठरलेले अन् आता पात्र ठरणारे असे आहेत शेतकरी!तालुका यापूर्वी पात्र ठरलेले आता पात्र ठरणारेअकोला १७२७२ ४९७९९अकोट २०९८० ३९२७०बाळापूर १६२६७ २३८७५बार्शीटाकळी १५६८२ २०८४५पातूर १३४१९ १९२१७तेल्हारा १८४३९ १८३६७मूर्तिजापूर १३८४३ ३४३९८....................................................................................................एकूण ११५९०२ २०५७७१
‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत सरसकट सर्व शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय शेतकºयांच्या हिताचा आहे. शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात अंमलबजावणीची कार्यवाही करण्यात येणार आहे.-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी.