अकोल्यात दोन लाखाचा नायलॉन मांजा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 06:32 PM2021-01-14T18:32:31+5:302021-01-14T18:34:57+5:30
Akola Crime News दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला.
अकोला: डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भगतवाडी परिसरातील गल्ली क्रमांक १० मध्ये बुधवारी रात्री दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला. कारवाईत पोलिसांनी मांजा विक्रेत्यास अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भगतवाडी परिसरातील गल्ली क्रमांक १० मधील रहिवासी मोहम्मद राजिक मोहम्मद सलीम याच्या घरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा साठा आहे. या माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री उशीरा मोहम्मद राजिक याच्या घराची झडाझडती घेतली. घरातील गोदामात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मांजाची किंमत दोन लाख रुपये सांगण्यात येत आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी मांजा व्यावसायिक मोहम्मद राजिक मोहम्मद सलीम याच्या विरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकोला: डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भगतवाडी परिसरातील गल्ली क्रमांक १० मध्ये बुधवारी रात्री दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला. कारवाईत पोलिसांनी मांजा विक्रेत्यास अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भगतवाडी परिसरातील गल्ली क्रमांक १० मधील रहिवासी मोहम्मद राजिक मोहम्मद सलीम याच्या घरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा साठा आहे. या माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री उशीरा मोहम्मद राजिक याच्या घराची झडाझडती घेतली. घरातील गोदामात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मांजाची किंमत दोन लाख रुपये सांगण्यात येत आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी मांजा व्यावसायिक मोहम्मद राजिक मोहम्मद सलीम याच्या विरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.