अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार २ डिसेंबर रोजी जिल्ह्यात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या २९५ वर गेली. अारटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये १० असे एकूण ३६ नवे पॉझिटिव्ह रुग्णआढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ९५०१ झाली आहे. दरम्यान, आणखी १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण २०१ अहवाल प्राप्त झाले.यापैकी २६ अहवालपॉझिटिव्ह, तर उर्वरीत १७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये डाबकीरोड येथील तीन, मलकापूर येथील तीन, गाडगेवाडी पातूर येथील दोन, कौलखेड येथील दोन, तर खडकी, सिव्हील लाईन,महसूल कॉलनी, रतनलाल प्लॉट, लकडगंज, किनखेड (पूर्णा), व्यंकटेशनगर, सांगळुद बु., रणपिसेनगर, गोरक्षण रोड, सांगवी खु, तेल्हारा, पंचशिल नगर, कैलास टेकडी व बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
अकोला, अकोलखेड येथील दोघांचा मृत्यू
बुधवारी जठारपेठ येथील ५६ वर्षीय पुरुषाचा हॉटेल रेजेन्सी येथील कोविड सेंटर मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांना १३ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. अकोलखेड ता. अकोट येथील ४५ वर्षीय रुग्णाचाही मृत्यू झाला. त्यांना २८ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये १० पॉझिटिव्ह
रविवारी झालेल्या एकूण १२० रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २५४७६ चाचण्यांमध्ये १८०३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
५९३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८६११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.