अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, १५६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 01:26 PM2021-02-23T13:26:24+5:302021-02-23T13:26:33+5:30
CoronaVirus in Akola मंगळवार, २३ फेब्रुवारी रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५७ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, मंगळवार, २३ फेब्रुवारी रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५७ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२९, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये २७ अशा एकूण १५६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४,२९७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६८९ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५६० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील १८, बाबुळगाव येथील १६, लोहारा येथील १३, गोरक्षण रोड येथील ११, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व कंजरा येथील प्रत्येकी चार, मलकापूर, खिरपूरी बु. व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, अयोध्या नगर, तापडीया नगर, दातवी, सहकार नगर, कौलखेड व कोठारी बु. येथील प्रत्येकी दोन, गणेशनगर, खदान, कलेक्टर ऑफिस, केशव नगर, खडकी, हिंगणा रोड, जीएमसी हॉस्टेल, केळीवेळी, सातव चौक, जूने शहर, रणपिसे नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, गाडगे नगर, सिंधी कॅम्प, जठारपेठ, वडद, बोरगाव मंजू, मनारखेड, आगर, पातूर, हिंगणा उमरा, पिंपरी अडगाव, सुधीर कॉलनी, बी अँड सी क्वॉर्टर, पाचगणी ता.पातूर, मोठी उमरी, अकबर प्लॉट, निभोंरा, बार्शीटाकळी, बोरगाव वैराळे व दहिहांडा येथील प्रत्येकी एक अशा १५६ रग्णांचा समावेश आहे.
दोघांचा मृत्यू
मंगळवारी सिद्धार्थवाडी, नायगाव अकोला येथील ६१ वर्षीय पुरुष व माऊलीनगर, खडकी येथील ७४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला. दोघांना अनुक्रमे १८ व २२ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
२,३०९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,२९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,६३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,३०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.