अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, ६ मार्च रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५१, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ५३ अशा एकूण ३०४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८,६९३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११५४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९०३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ७४ महिला व ११७ पुरुषांचा समावेश आहे.
दोघांचा मृत्यू
शनिवारी सिव्हिल लाईन अकोला येथील ७३ वर्षीय पुरुष व नायगाव, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २७ फेब्रुवारी २ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
४,६४२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८,६९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,३६८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,६४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.