दिवसभरात दोन बळी; ९३ पॉझिटिव्ह, ७० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 07:01 PM2020-09-08T19:01:28+5:302020-09-08T19:01:44+5:30
मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६८ झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८०९ झाली आहे.
अकोला : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ‘अनलॉक’ झालेल्या कोरोनाने जिल्ह्यात नकोशा विक्रमाला गवसणी घातली असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल ९३ नव्या रुग्णांची भर पडल्याने अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा प्रथमच हजाराचा आकडा पार करत १०१३ वर पोहचला. मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६८ झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८०९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३२९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७८ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये २२ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये १५ मुर्तिजापूर येथील, गौरक्षण रोड येथील सात, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, महान व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन, तोष्णीवाल लेआऊट, जीएमसी क्वॉटर, कौलखेड, पळसो बढे, जवाहर नगर, शेकापूर ता. पातूर, केशव नगर, रणपिसे नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन, वासूदेव नगर, बार्शीटाकळी, साखरविरा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, आलेगाव, नागे लेआऊट, व्हिएचबी कॉलनी, गोयका नगर, भंडारज ता. पातूर, आरपीटीएस, गजानन पेठ, स्टेशन रोड, राजूरा प्लॉट, रेडवा ता. बार्शिटाकळी, सोपिनाथ नगर, खडकी, कृषी नगर, वाशिम बायपास, न्य तारफैल, जीएमसी हॉस्टेल व खेतान नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
लहान उमरी व वाडेगाव येथील रुग्णांचा मृत्यू
मंगळवारी एकाचा उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एज रुग्ण लहान उमरी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष असून, त्यांना ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला करण्यात आले होते. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचाही आज दुपारी मृत्यू झाला. त्यांना ३१ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.
७० जण कोरोनामुक्त
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ४१, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून सहा, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून सहा अशा एकूण ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
१०१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३६२८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.