उमा प्रकल्प ओव्हरफ्लो, पिंपळशेडा व शिवण प्रकल्प निम्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 08:25 PM2021-09-27T20:25:07+5:302021-09-27T20:25:24+5:30
Murtijapur News : पिंपळशेंडा व शिवण लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षा जास्त जलसाठा आहे.
-संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली आहे. तालुक्यातील ५७ खेड्यांचासाठी संजीवनी असलेला व महत्वाचा असलेला उमा प्रकल्प शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शंभर टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला असला तरी पिंपळशेंडा व शिवण लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षा जास्त जलसाठा आहे.
तालुक्यातील महत्वपूर्ण व पिण्याच्या पाण्याठी वापण्यात येत असलेला उमा प्रकल्पावर लंघापुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत. याच बरोबर दोन लघु प्रकल्पांमध्ये पिंपळशेंडा ६२.५६ टक्के तर शिवण ६४.६१ टक्के भरलेले आहे. उमा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ५७ खेडी योजनेतील गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दुर झाली आहे. परंतु पिंपळशेडा व शिवण या लघु प्रकल्पांवर शेत सिंचनाचे मोठे क्षेत्र अवलंबून आहे. ११.६८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उमा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या लंघापुर ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत ५७ खेड्यांसाठी ०.७० दशलक्ष घनमीटर जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर २२४१ हेक्टर शेती सिंचनासाठी ६ ते ७ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव आहे. सद्यस्थितीत या जलाशयाने ३४४.०० असलेली पातळी ओलांडून ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन ७६.६४ विसर्ग होत आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडूनही पिंळशेडा व शिवण प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा असल्याने भविष्यात शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जसाठ्यातुन बाष्पीभवन वगळून केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकेल, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे अशक्यप्राय असल्याची स्थिती आहे.
२०१९ मध्ये उमा व पिंपळशेंडा प्रकल्प २१ अॉगष्ट पर्यंत १०० टक्के भरुन ओसंडून वाहत होते. मात्र यावर्षी २७ सप्टेंबर पर्यंत या प्रकल्पात निम्म्याच्यावरच जलसाठा उपलब्ध झाला आहे. उमा प्रकल्पामध्ये आजचा १०० टक्के, पिंपळशेंडा ६२.५६ टक्के तर शिवण ६४.६१ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. शिवण आणि पिंपळशेंडा लघु प्रकल्पातून पाण्याचा केवळ शेती सिंचनासाठी उपयोग होतो परंतु अंत्यत कमी जलसाठा उपलब्ध असल्याने परीसराती रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याने पिक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्यापही ही जलाशये तुडूंब भरली नसल्याने भविष्यात तालुक्यातील बागायती शेती व रब्बी हंगामात यापाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात येणार आहे.