अकोटात अवैध धंदे वाढले : वशेष पथकाची जुगारावर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:34 PM2018-01-15T23:34:49+5:302018-01-15T23:35:10+5:30
अकोला : अकोटमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी छापेमारी केली. तीन जुगार अड्डय़ांवरून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोट शहरातील लक्कडगंज परिसरात विशेष पथकाने छापा टाकून लोहारी ये थील रहिवासी जनार्दन वामन वानखडे व आंबोडा येथील रहिवासी प्रमोद देवीदास शेवळे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर श्रीनिवास सिनेमागृहासमोरील जुगार अड्डय़ावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. यामध्ये खानापूर वेस येथील रहिवासी अशोक महादेव तेलगोटे, संजय महादेव वानखडे व भाकर पुर्यातील शेख मुख्तार शेख मनवर या तिघांचा समावेश आहे, तर या ठिकाणवरून पवन ठाकू र पळून जाण्यात यशस्वी झाला. या जुगार अड्डय़ावरून पाच हजार १३0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर तिसरी कारवाई अंजनगाव रोडवर करण्यात आली. या ठिकाणावरील जुगार अड्डय़ावरून श्याम मधुकर भांबुरकर, शशिकांत मनोहर पिंजरकर व सुधीर दत्ताेपंत सोनकर या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, गणेश गलांडे हा पळून गेला. या जुगारावरून विशेष पथकाने तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने ही कारवाई केली.