- नितीन गव्हाळेअकोला: जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या झपाट्याने घसरत असल्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आली आहे. दरवर्षी ६0 ते ६५ शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली आहे. ही संपूर्ण गोळा झाल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे दरवर्षी अनेक शिक्षकांना अतिरिक्त ठरावे लागत आहे. अतिरिक्त ठरण्याची शिक्षकांमध्ये प्रचंड धास्ती आहे. अतिरिक्त ठरल्यानंतर योग्य शाळेत समायोजन होईल की नाही, याची खात्री नाही आणि समायोजन झाले तर कोणती शाळा मिळेल, हेही सांगता येत नाही. त्यामुळे अतिरिक्तचा विषय आला की, शिक्षकांना धडकी भरते. आता नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्यावर माध्यमिक शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळांकडून त्यांच्याकडील आरक्षणनिहाय रिक्त पदे, विषयनिहाय अतिरिक्त ठरत असणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविली आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून ५ आॅगस्टपर्यंत ही माहिती सादर करण्यास बजावले आहे. त्यानुसार शाळांमध्ये ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अतिरिक्तची कुºहाड कोसळण्याची भीती असणारे शिक्षक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. यंदाचे वर्ष तरी निभावले पाहिजे, यासाठी अनेकजण प्रार्थना करीत आहेत. काही शाळांमध्ये रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची नावे काढली आहेत. आतापर्यंत २२ अतिरिक्त शिक्षकांची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे. यंदा तातडीने समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने, उर्वरित शाळांनी तातडीने ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.
यंदाही ५0 च्यावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता!गतवर्षी ६७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. याअतिरिक्त शिक्षकांचे आॅनलाइन प्रक्रियेने समायोजन करण्यात आले होते. अनेक शिक्षकांना ग्रामीण भागातील शाळा मिळाल्यामुळे नाराजी पसरली होती. अशातच गतवर्षी २३ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेच नव्हते. त्या शिक्षकांना निवडणूक विभागात काम देण्यात आले होते.
‘त्या’ २३ अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम समायोजनगतवर्षी ६७ पैकी २३ अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी विभाग स्तरावर पाठविण्यात आले होते; परंतु विभाग स्तरावरही त्यांचे समायोजन झाले नव्हते. त्यामुळे यंदा तरी आमचे समायोजन व्हावे, अशी अपेक्षा अतिरिक्त शिक्षकांनी केली आहे. त्यामुळे यंदा समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राधान्याने त्या २३ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.यंदा समायोजनाची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी अनुदानित शाळांकडून रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली आहे. आतापर्यंत २२ अतिरिक्त शिक्षकांची माहिती प्राप्त झाली आहे. उर्वरित शाळांनी ही माहिती तातडीने सादर करावी.-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक.