जिल्ह्यातील ३० टक्के जनावरांचे लसीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:30+5:302021-06-21T04:14:30+5:30
पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना साथरोग होऊ नये, यासाठी नियमित लसीकरण करण्यात येते. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या आणि घटसर्प आजार होण्याची शक्यता ...
पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना साथरोग होऊ नये, यासाठी नियमित लसीकरण करण्यात येते. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या आणि घटसर्प आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे नियोजन केले होते. यानुसार पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. जिल्ह्यात लस पुरवठा करण्यात आला आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तालुका स्तरावर लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०-३५ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे.
दिलेल्या सूचनांचे पालन करून जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात जनावरे रोगग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या ठिकाणच्या जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे.
- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन
उद्रेकाच्या ठिकाणी आधी लसीकरण
पशुसंवर्धन विभागाने घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण नियोजन केले आहे. नियोजन करताना गेल्या काही वर्षांत या आजारांचा ज्या ठिकाणी उद्रेक झाला होता, त्या ठिकाणी आधी लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित भागात लसीकरण करण्याचे नियोजन विभागाने केले आहे.
असा आहे लसीचा साठा...
घटसर्प
१ लाख
फऱ्या
६० हजार
आंत्रविषार
८० हजार