लस संपली; कोविड विरुद्धच्या लढाईचा वेगही मंदावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:30+5:302021-07-30T04:19:30+5:30
आज दोन केंद्रांवरच लसीकरण १) नागरी आरोग्य केंद्र, खदान (शाळा क्र. १६ आदर्श कॉलनी) कोव्हॅक्सिन - (दुसरा डोस- ५० ...
आज दोन केंद्रांवरच लसीकरण
१) नागरी आरोग्य केंद्र, खदान (शाळा क्र. १६ आदर्श कॉलनी)
कोव्हॅक्सिन - (दुसरा डोस- ५० ऑनलाईन अपॉईंटमेंट)
कुपन - दुसरा डोस - १५० (वेळ - सकाळी ९ ते २)
२) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोविशिल्ड - (दुसरा डोस - ७५ ऑनलाईन अपॉईंटमेंट)
कुपन - दुसरा डोस - ७५ (वेळ - सकाळी ९ ते २)
गर्भवतींचे लसीकरणही प्रभावित
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी ४७ गर्भवतींचे लसीकरण झाले. त्यानंतर लसीच्या तुटवड्यामुळे ही मोहीमदेखील प्रभावित झाली.
अनेकांना पहिल्या डोसची प्रतीक्षा
सद्यस्थितीत दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, अनेकांमध्ये दुसऱ्या डोसविषयी अद्याप उदासीनता दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. दुसरीकडे अनेकांना पहिल्या डोसची प्रतीक्षा कायम आहे. ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी स्लॉट बुक करण्यास मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. जिल्ह्यासाठी लसीचा पुरवठा होणार आहे. लसीचा पुरवठा झाल्यानंतर जिल्ह्यातील लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होणार आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला