राजरत्न सिरसाट/नीलेश जोशी/संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्चिम विदर्भात (व-हाड) सकाळी मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरिपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाल्यासह फळे मातीमोल झाली. बुलडाणा जिल्हयात वीज अंगावर पडून निकिता गणेश राठोड ही मुलगी ठार झाली असून, वाशिम जिल्ह्यात गारांच्या तडाख्यात सापडूनमहागाव येथील यमुनाबाई हुंबाड या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तिन्ही जिल्ह्यांत १० जण जखमी झाले.अकोला जिल्हा प्रशासनाने जीवितहानी व पीक नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले. सकाळी ६ वाजेपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर जिल्ह्यातील वेगवेगळ््या भागांत सुरूच होता. सोंगणीला आलेल्या तूर, हरभरा पिकांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे कांदा, फळबागांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान तेल्हारा तालुक्यात झाले.वाशिम जिल्ह्यात सकाळी ९ वाजता काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. रिसोड, मालेगाव तालुक्यात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. २५ गावांत अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या. वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातही पिकांचे नुकसान झाले.
व-हाडात भाजीपाला, फळे झाली मातीमोल; दोघांचा बळी, १० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:00 AM