लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अनधिकृत स्कूल व्हॅन, बसवर व आॅटोरिक्षा तसेच खासगी वाहनातून होणाऱ्या विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक करणारी वाहने आरटीओ विभागाच्या रडारवर असून, तपासणी मोहिमेत एकाच आठवड्यात ३४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृत स्कूल व्हॅनद्वारे वाहतूक होत असल्याने स्कूल बस वाहतूक नियमावलीचे अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास या तपासणी मोहिमेत निदर्शनास आले आहे. विशेष मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया मोटारसायकलची तपासणी करण्यात येत असून, यावेळी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्यास अथवा चालक तसेच सहप्रवासी, विद्यार्थी यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया आॅटोरिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात आलेली नसतानाही त्यांच्याकडून वाहतूक होत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया खासगी वाहनांविरुद्ध, शालेय विद्यार्थ्यांची कंत्राटी पद्धतीने वाहतूक करणाºया आॅटोरिक्षाविरुद्ध या मोहिमेत कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.विहित परवान्याशिवाय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध स्कूल बस नियमावलीतील तरतुदीचा भंग केल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच आॅटो चालकांची बैठक घेऊन आॅटोरिक्षाने मीटरप्रमाणे भाडे आकारणे, शेअर रिक्षा मार्गावर अथवा प्रीपेड मार्गावर मंजूर भाडे आकारणे शक्य आहे का, याचाही विचार या बैठकीत करण्यात येणार आहे.
‘आरटीओ’कडून स्कूल बससह वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 2:36 PM
तपासणी मोहिमेत एकाच आठवड्यात ३४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपरवान्याशिवाय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. नियमावलीतील तरतुदीचा भंग केल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे.