अकोला : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत ‘अनलॉक - ५’ मध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार असून, राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. या अनुषंगाने रेल्वेकडून संभाव्य रेल्वेगाड्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेससह अकोल्याहून जाणाऱ्या सहा गाड्यांचा समावेश आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत सहा महिन्यांपासून रेल्वेची नियमिती सेवा बंद असून, केवळ विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. अनलॉक- ५ अंतर्गत राज्यांतर्गत एका शहरातून दुसºया शहरात जाणाºया रेल्वेगाड्या सुरू करण्यास राज्य शासनाने मुभा दिली आहे. या पृष्ठभूमीवर आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता मध्य रेल्वेने परराज्यात जाणाºया १५ विशेष गाड्यांसह राज्यांतर्गत धावणाºया १९ रेल्वेगाड्यांची संभाव्य यादी जाहीर केली असून, यापैकी सहा गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणाºया आहेत. यामध्ये मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस व पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस या सहा जोडी गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार केला असून, लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.