VIDEO : अकोल्यातील किल्ल्यावर साकारला शिवकाळ
By Admin | Published: October 28, 2016 01:08 PM2016-10-28T13:08:52+5:302016-10-28T15:41:21+5:30
अकोल्यात राजेंद्र सोनवणे या कलावंताने दिवाळीनिमित्त खास किल्ला उभारून शिवकाळाचे प्रत्यंतर नागरिकांना दिले आहे.
प्रविण ठाकरे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २८ - शिवकाळातील किल्ले व त्या काळातील जनजीवन याचे चित्रण इतिहासाच्या पुस्तकांमधून अन चित्रपटातून पहायला मिळते. अकोल्यात मात्र राजेंद्र सोनवणे या कलावंताने दिवाळीनिमित्त खास किल्ला उभारून शिवकाळाचे प्रत्यंतर नागरिकांना दिले आहे. आठ फूट उंचीचा हा किल्ला असून गडकोटावरून घोरपडीच्या शेपटीच्या मदतीने किल्ला सर करणारे मावळे, तसेच हत्ती, घोडे, पशु-पक्षी, बैलगाडीतून जात असलेले जोडपे अशा अनेक प्रतिकृतींनी हा किल्ला सजला आहे. शिवकाळाचे प्रत्यंतर देतानाच त्यांनी पारंपारिक खेळाचे छायाचित्र लावून जुन्या खेळांची नव्या पिढीला ओळख देण्याचाही प्रयत्न केला आहे. आटयापाटया, गोटया खेळणे, लगोरी, विटी दांडू अशा अनेक खेळांच्या चित्रांनी मोठयांनाही आपले जुने दिवस आठवत आहेत.