हातरुण: हातरुण ते बोरगाव वैराळे आणि कारंजा रमजानपूर या मार्गावर आश्रमशाळेसमोर असलेल्या टी-पॉइंटवर चार महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. पुलाच्या दोन्ही बाजूंनी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. त्यामुळे पुलाच्या बाजूने पाण्याचा तलाव निर्माण झाला आहे. या पुलाखालून पाणीच वाहत नसल्याने हा पूल सध्या शोभेची वास्तू ठरला आहे.शासनाने हजारो रुपये खर्च करून टी-पॉइंटजवळ पुलाचे काम पूर्ण केले. पुलाचे बांधकाम करताना खोदून ठेवलेली माती अजूनही त्याच ठिकाणी कायम आहे. पुलाच्या दोन्ही काठांनी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. पाण्याची विल्हेवाट लावण्यात न आल्याने पुलाच्या एका बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुलाचे बांधकाम केल्यानंतर संबंधित विभागाला या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पुलाचे बांधकाम केलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. या मातीच्या ढिगाºयाला पाणी अडले असून, हे ढिगारे हटविण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे. या पुलापासून हाकेच्या अंतरावर दोन शाळा असून, या मार्गावरून विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून साप, विंचू, डासांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुलाच्या जवळ पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे मातीचे ढिगारे हटवून पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकेश गव्हाणकर, प्रा. विजय अग्रवाल, अरुण दातकर, धनंजय खेडकर, मनोज अग्रवाल, महेश गावंडे, अक्षय खंडेराव, अमोल पायघन, निखिल तिजारे, अमित काळे, प्रशांत तरोळे, अमोल चौधरी, अजय सोनोने, गोपाल सोनोने, अक्षय खंडेराव, राजेश काळे, पंकज सोनोने, जाविद शाह यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.फोटो आहे