काेराेना नियमांचे उल्लंघन, १४ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:51+5:302021-06-21T04:14:51+5:30
सचिन राउत अकाेला : काेराेनाची दुसरी लाट प्रचंड प्रमाणात आल्यानंतर राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत कडक ...
सचिन राउत
अकाेला : काेराेनाची दुसरी लाट प्रचंड प्रमाणात आल्यानंतर राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत कडक संचारबंदी लागू केल्यानंतर या नियमांचे पालन न करणाऱ्या २५ हजार वाहनांवर काेराेना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे़ या वाहनचालकांकडून सुमारे १४ लाख रुपये ५ हजार दंड वसूल करण्यात आला आहे़ तर एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत़
अकाेला जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली़ दाेन महिन्यांच्या या कालावधीत काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फाैजदारी कारवाई करण्यात आली आहे़ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी माेहीम राबवून २५ हजार ५२७ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली़ तर त्यांच्याकडून १४ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार २१६ जणांवर कारवाई करीत शहराच्या विविध पाेलीस ठाण्यात ८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यासाठी वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काेराेनातही प्रचंड मेहनत करून या कारवाया केल्याची माहिती आहे़
ग्राफ
ट्रिपल सीट ४५८
विनामास्क १०८
विनाहेल्मेट ०१
नाे पार्किंग ४९६
माेबाइलवर बाेलणे ४१०
विनानंबर प्लेट १३
फॅन्सी नंबर प्लेट ००
विना लायसन्स ५०
या व्यतिरिक्त २५ हजार ५८ कारवाया
वरील कारवाया वगळता २५ हजार ५८ कारवाया या इतर असल्याची माहिती आहे़ यासाठी वाहतूक शाखेने विशेष माेहीम राबवून ऑटाे तसेच दुचाक्या जप्त केल्या हाेत्या. प्रतिज्ञापत्र तसेच हमी घेतल्यानंतर ही वाहने साेडण्यात आली आहेत़ यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर व शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनीही माेहिमेत सहभाग घेऊन वाहनांवर कारवाई केली़
काेराेनाकाळात दाेन महिन्यांत जीवाची पर्वा न करता प्रत्येक कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली़ त्यामुळे काेराेनाकाळात अनेकांना काेराेनाची लागणही झाली. आताही कारवायांचा सपाटा सुरूच राहणार आहे. नागिरकांनी स्वत:ची सुरक्षा घ्यावी तर ऑटाे चालकांनीही क्षमतेेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करू नये़
- गजानन शेळके,
प्रमुख वाहतूक शाखा, अकाेला