नियमांचे उल्लंघन; अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाइ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 10:37 AM2021-02-20T10:37:57+5:302021-02-20T10:38:07+5:30
Akola News २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आला
अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये ‘फिजीकल डिस्टन्सिंग‘ व मास्कचा वापर इत्यादी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील १४४ जणांविरुध्द शुक्रवारी दंडात्मक कारवाइ करण्यात आली. त्यामध्ये २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आला. महसूल , महानगरपालिक व पोलीस विभागाच्या संयुक्त १० पथकांनी ही कारवाइ केली.
जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून, कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यमुळे कारोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या आदेशानुसार १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून जिल्हयात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या आदेशाच्या अंमलबजावणीत ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ व मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाइ करण्यात येत आहे. त्यामध्ये १९ फेब्रुवारी रोजी अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी निलेश अपार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या नेतृत्वात महसूल, मनपा व पोलीस विभागाच्या संयुक्त दहा पथकांनी शहरातील गांधी रोड, किराणा बाजार, भाजी बाजार, सराफा बाजार आदी ठिकाणी तसेच हाॅटेल व दुकानांमध्ये फिजीकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर इत्यादी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाइ करण्यात आली. त्यामध्ये २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दोन दिवसांत ४०७ जणांविरुध्द दंडात्मक कारवाइ
अकोला शहरात १८ व १९ फेब्रुवारी रोजी या दोन दिवसांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या ४०७ जणांविरुध्द संयुक्त पथकांव्दारे दंडात्मक कारवाइ करण्यात आली असून, ८७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असे अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी निलेश अपार यांनी सांगीतले.