दीक्षांत समारोहासाठी माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:17 PM2019-02-05T13:17:15+5:302019-02-05T13:17:20+5:30

माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग असल्याचा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केला.

The violation of the tradition of inviting the ex-vice chancellor for the convocation! | दीक्षांत समारोहासाठी माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग!

दीक्षांत समारोहासाठी माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग!

googlenewsNext


अकोला: राजकारणाला बळी न पडता कृषी विद्यापीठाची एक इंच जमीन व मालमत्तेला हात लावू दिला नाही. खरेदी हस्तक्षेप रोखला. खुर्चीच्या प्रेमात कधीच पडलो नाही. कृषी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी काम केले. असे असताना दीक्षांत समारंभाला गत दोन वर्षांपासून मला आमंत्रित केले जात नाही, हा माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग असल्याचा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केला.
ह्युस्टन टेक्सास येथून ई-मेलद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरू ंना पाठविलेल्या पत्राची प्रती लोकमतलादेखील पाठविली. या पत्रामध्ये डॉ. दाणी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, दोन वर्षांपूर्वी मी निवृत्त झालो. त्या वेळपासून या कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून दीक्षांत समारंभाला मला बोलावले जात नाही. माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याची परंपरा तोडण्याचा अधिकार विद्यमान कुलगुरू कडे आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यमान कुलगुरूं च्या जबाबदारीची आठवण करू न देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी याच कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी असून, माझे वडीलही याच विद्यापीठात कार्यरत होते. माझे शिक्षकही अस्तित्वात आहेत. माझ्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी समितीच्या परवानगीशिवाय विद्यापीठाची जमीन व मालमत्ता ताब्यात देणार नाही, असा साहसी निर्णय घेतला. विद्यापीठाचे विभाजन नेहमीच नाकारले. कार्यकारी आणि शैक्षणिक परिषदेचा अध्यक्ष म्हणून अधिकार आणि पावित्र्य, कर्तव्य शेवटपर्यंत काळजीपूवक, निडरपणे पूर्ण केले. नागपूर येथील मोठे प्रेक्षकगृह नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू न प्रेक्षकगृह पुन्हा विद्यापीठाला मिळवून दिले. या अगोदर ते शक्य झाले नाही. खरेदी कार्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली नाही. कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पारदर्शी, राजकीय हस्तक्षेपमुक्त ठेवली. विद्यापीठाला राजकीय रणांगण होऊ दिले नाही; पण आपण माझ्या सेवानिवृत्तीपासून अपमानास्पद वागणूक दिली आहे. हे कोणाच्या ऐकण्यावरू न तर आपण करीत नाहीत ना, असेही त्यांनी म्हटले आहे.
कुलगुरू पदी माझी नियुक्ती रद्द केली गेली. ती वैयक्तिक वैध कारणे नव्हती? सर्वोच्च न्यायालयांनी असामान्य वैयक्तिक गुणवत्ता आणि अखंडतेचे प्रमाणपत्र मला दिले आहे. गुणवत्तेवर मी कुलगुरू झालो. खुर्चीच्या प्रेमात पडलो नाही. शेवटपर्यंत लढलो. माझा कार्यकाळ संपण्याला १४ दिवस बाकी असताना, मला राज्यपालांनी नियुक्त केले; पण नागरिकत्वाच्या अवास्तिक प्रश्नावर प्रशासकीय अनियमितता या कारणास्तव माझी मूळ नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यामध्ये माझा दोष काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पत्राच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचेही त्यांनी कुलगुरू ंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

Web Title: The violation of the tradition of inviting the ex-vice chancellor for the convocation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.