कीर्तन,भजन करून वारकऱ्यांनी सुरू केले उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 06:21 PM2020-12-02T18:21:37+5:302020-12-02T18:22:14+5:30
Akola News : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बुधवारी उपाेषणाला प्रांरभ करण्यात आला.
अकाेला: देवस्थान उघडली आणि गावागावात धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली; पण ज्या गावात गट-तट आहेत त्या गावातील सप्ताह कमिटी चे कार्यकर्ते कार्यक्रमाला कुणाचाही अडथळा होऊ नये व पोलिस कारवाई आपल्यावर होऊ नये याकरिता रीतसर पोलीस स्टेशनमध्ये परवानगी मागण्याकरिता जात आहेत परंतु धार्मिक कार्यक्रमाला अजून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू रितसर परवानगी देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बुधवारी उपाेषणाला प्रांरभ करण्यात आला. यावेळी उपाेषण मंडपात भजन किर्तन करण्यात आले तसेच दिवसभर विठठलाचा जयघाेष करण्यात आला.
आमरण उपोषणाला फक्त एकच वारकरी बसणार असून इतर वारकरी मंडळी साखळी पद्धतीने आमरण उपोषण करणार आहेत या उपाेषण मंडपात 11-30 ते 2 वाजेपर्यंत सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम राहील भजनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत चक्री कीर्तनाचा कार्यक्रम राहील सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ अशा पद्धतीने उपोषण आंदाेलनाचे नियाेजन केले आहे. यावेळी विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांचेसह रामकृष्ण महाराज अम्बुस्कर, महादेव महाराज निमकांडे, विठ्ठल महाराज साबळे , हभप प्रवीण महाराज कुलट, श्रीकृष्ण महाराज बाभूळकर, हभप शिवा महाराज बायस्कर, हभप गोदावरीताई बंड, सोपान महाराज उकर्डे, विक्रम महाराज शेटे, शिवहरी महाराज इस्तापे, मंगेश महाराज ठाकरे, विजय महाराज राउत, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, श्रीधर महाराज तळोकार, गोपाल महाराज बाहे, गजानन महाराज दहीकर, कृष्णा महाराज पाटील, योगेश महाराज कावथळकर , विलास महाराज कराड, अमोल महाराज कुलट, वैभव महाराज अस्वार, शाम महाराज साबळे, ज्ञानेश्वर महाराज भुसकट, गोपाल महाराज रेवसकर, केशव महाराज धोटे, राजु ऊ खुळे आदी सहभागी झाले आहेत.