कृषी व घरगुती वीज पुरवठा खंडित केल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:15+5:302021-03-25T04:18:15+5:30

दारूवरील परवाना शुल्क ५० टक्के कमी करून सर्वसामान्यांना दारू प्या, अशी प्रोत्साहन योजना सुरू करते. दुसरीकडे बिल्डरांना मदत करते, ...

Warning of agitation in case of interruption of agricultural and domestic power supply | कृषी व घरगुती वीज पुरवठा खंडित केल्यास आंदोलनाचा इशारा

कृषी व घरगुती वीज पुरवठा खंडित केल्यास आंदोलनाचा इशारा

Next

दारूवरील परवाना शुल्क ५० टक्के कमी करून सर्वसामान्यांना दारू प्या, अशी प्रोत्साहन योजना सुरू करते. दुसरीकडे बिल्डरांना मदत करते, परंतु कोरोना काळात वीज दराची वाढ करून शेतकरी व सर्वसामान्य यांची वीज कपात व विद्युत पुरवठा खंडित करून जनतेला वेठीस धरण्याचे काम महाआघाडी शासन करीत आहे. एप्रिलपासून वाढवलेली वीजदरवाढ परत घ्यावी, तसेच बिलामध्ये सरासरी लावलेली फी माफ करावी, शेतीविषयक कनेक्शन कपात त्वरित थांबवावी अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा भाजप पातूर तालुकातर्फे देण्यात आला. यावेळी रमण जैन, विजयसिंह गहिलोत, प्रा. गजानन खंडारे, चंद्रकांत अंधारे, प्रेमानंद श्रीरामे, राजु उगले, अभिजीत गहिलोत, ज्ञानेश्वर जाधव, भिका धोत्रे, मार्तंडराव मोकळकार, विश्वासराव देशमुख, सुरेश देवकते, गजानन निमकाळे, रामभाऊ गोळे, सुनील इंगळे, नाजूक दुतोंडे , माणिक इंगळे, कपिल खरप, श्रीकृष्ण लठाळ, सचिन शेवलकार, निशांत बायस, किरण निमकंडे, प्रभाकर कवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Warning of agitation in case of interruption of agricultural and domestic power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.