लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्चिम विदर्भातील (वर्हाड) पाच जिल्हय़ांतील धरणात आता केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये अध्र्यांच्यावर गाळ आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्क्यावर आल्याने वर्हाडात जलसंकट गडद झाले. वर्हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पांत आजमितीस ३१.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा या मोठय़ा धरणात १२.८४ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १४.२१ टक्के, निर्गुणा ५१.९६, उमा धरणात केवळ २.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ८५.४२ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात २४.६0 टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २१.६३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ४७.0४, मसमध्ये ११.८४ टक्के, कोराडी ११.६४, पलढग ५९.९२, मन १५.६७ तोरणा १९.९0 टक्के, तर उतावळी धरणात २७.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २0.८८ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात २१.५५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणात १८.९५ टक्के, अरुणावतीमध्ये १२.४६, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्हय़ातील उध्र्व वर्धा या मोठय़ा धरणात ८२.३५ टक्के एवढा बर्यापैकी जलसाठा शिल्लक आहे.
बाष्पीभवनाचा दर ६.२ मिलिमीटर!बाष्पीभवनाचा दर मागील जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ३.६ मिलिमीटर एवढा होता. आता त्यामध्ये ६.२ म्हणजे दुप्पट वाढ झाली. तापमान वाढले तर बाष्पीभवनाचा वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो. त्यामुळे येत्या महिन्यात जलसाठय़ात मोठी घट होण्याची शक्यता आहे.