अकोला एमआयडीसीला तीन दिवसाआड पाणी पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 08:08 PM2017-11-21T20:08:04+5:302017-11-21T20:58:21+5:30

अकोला जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा डिसेंबर पुरेल ऐवढाच असल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे.

Water supply to MIDC for three days | अकोला एमआयडीसीला तीन दिवसाआड पाणी पुरवठा!

अकोला एमआयडीसीला तीन दिवसाआड पाणी पुरवठा!

googlenewsNext
ठळक मुद्देडिसेंबरपर्यंत पुरेल कुंभारीचा जलसाठा २४ ला अमरावतीत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा डिसेंबर पुरेल ऐवढाच असल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठ्यावर पर्याय शोधण्यासाठी येत्या २४  नोव्हेंबर रोजी अमरावती येथे बैठक बोलाविण्यात आली आहे.

 यंदा अकोल्यात पाऊस नसल्याने पीक तर गेलेचं. सोबतच पिण्याच्या पाण्याचीही नवी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हातील धरणांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे ६४ खेडी खांबोरा पाणी पुरवठा प्रकल्पातून होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा काही महिन्याआधी बंद करण्यात आला. त्यामुळे अकोला एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणी पुरवठा सुरू केला. मात्र कुंभारी तलावाचा जलसाठाही आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे अकोला एमआयडीसीचा पाणी पुरवठा तीन दिवस आड करण्यात आला आहे. डिसेंबर पर्यंत हे पाणी पुरेल मात्र त्यानंतर अकोल्यातील शेकडो उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Water supply to MIDC for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.