कान्हेरी गवळी येथे अहिंसा यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:20+5:302021-04-17T04:17:20+5:30
आचार्य श्री. महाश्रमण यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी अहिंसा यात्रेचा दिल्ली येथील लाल किल्यापासून आरंभ केला होता. आचार्य ...
आचार्य श्री. महाश्रमण यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी अहिंसा यात्रेचा दिल्ली येथील लाल किल्यापासून आरंभ केला होता. आचार्य श्री महाश्रमण हे तीन देश व देशातील २० राज्यात जवळपास ५५ हजार किलोमीटर पायी भ्रमण करून सद्भावनेचा प्रसार, नैतिकतेचा प्रसार, व्यसनमुक्ती प्रचार करीत असून, ही अहिंसा यात्रा जाती-पातीच्या भेदभावापासून दूर लोककल्याणासाठी आहे. शुक्रवारी या पदयात्रेचे आगमन बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे झाले. याप्रसंगी आचार्य श्री. महाश्रमण यांचे व त्यांच्या समवेत असलेले शांतीलाल जैन, विजय कुमार मेहता यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुनील नावकार, संतोष बिलबिले, नीलेश हाडोळे, संदीप घटोळ, ज्ञानेश्वर महाराज जावरकर, गणेश वाडेकर, डॉ. पेटकर, शुभम घाटोळ यांची उपस्थिती होती.