पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:40 AM2020-04-14T10:40:43+5:302020-04-14T10:40:57+5:30
पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते.
अकोला: खरीप हंगामातील नियोजन करण्याचे काम सुरू असून,पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांकडील भाजीपाला, फळे विक्रीसाठी मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.
अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
येत्या ३१ मे पर्यंत अमरावती विभागातील नियोजनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खते, बियाणे, कीटकनाशके ,औषधांचा पुरवठा करण्यासाठी घाऊक विक्रेते व वितरकाकडून बियाणे खतांचे ग्रेड इत्यादी माहिती घेऊन सहसंचालक कार्यालयाला पाठवावी त्यासाठीच्या सूचना सर्व कृषी सहाय्यक ते अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रत्येक दिवसाचा अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवण्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तालुका तसेच मंडळ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कच्चे काम सुरू आहे किंवा नाही, त्याचा अहवाल शेतकºयांना शेती कामासाठी लागणाºया मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामाच्या कालावधीसाठी ओळखपत्र देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी सहायकांना क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी त्यांना निर्धारित केलेल्या मुख्यालयी जातात किंवा नाही, याबाबत सरपंचाकडून खातरजमा करून घ्यावी, तसेच खरीप हंगामातील नियोजन करून अंमलबजावणीला सुरुवात करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
विभागात ३२ लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकºयांकडील फळे भाजीपाला विकण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- सुभाष नागरे,
विभागीय सह संचालक,
कृषी, अमरावती.