वर्षभरामध्ये नांदखेड व भंडारज फाटा आणि चिखलगावच्या वळणावर दोन्ही बाजूंच्या जंगलातून हरीण, काळवीट, रोही, माकडे आदी वन्य प्राणी अचानकच महामार्गावर येत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
महामार्गावरून महामार्गावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनाने जाताना, अचानक वन्य प्राणी रस्त्यावर आडवे येतात. यात वाहनांचा अपघात होताे. अपघातात वन्य प्राणी किंवा वाहन चालक जखमी होतात. त्यामुळे काही जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत.
त्यामुळे भंडारज फाटा, नांदखेड फाटा आणि चिखलगाव वळण सदर भूभाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वन्य प्राण्यांना रोडवर थेट येता येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे.
या महामार्गावरून दररोज शासकीय नोकरदार, व्यापारी, शिक्षक अकोला येथून पातुरला अप-डाऊन करतात. त्यांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.