बँक खात्यातून पळविलेली रक्कम २४ तासात परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 11:11 AM2021-01-30T11:11:55+5:302021-01-30T11:14:54+5:30

Cyber Crime News सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कापशी येथील शाखेमध्ये खाते असून त्यामध्ये ९० हजार रुपयांची रक्कम हाेती.

Withdraw money from bank account get back within 24 hours | बँक खात्यातून पळविलेली रक्कम २४ तासात परत

बँक खात्यातून पळविलेली रक्कम २४ तासात परत

Next
ठळक मुद्दे ५५ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचे त्यांना समजले.या प्रकरणाची तक्रार सायबर पाेलीस ठाण्यात केली.

अकाेला : कापशी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या एका ग्राहकाच्या बँक खात्यातून ऑनलाईन पळविलेली ५५ हजार रुपयांची रक्कम सायबर पाेलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनंतर २४ तासात परत मिळवल्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

कापशी येथील रहिवासी प्रकाश पुंडलिक इंगळे रा. कापशी तलाव यांनी सायबर पाेलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कापशी येथील शाखेमध्ये खाते असून त्यामध्ये ९० हजार रुपयांची रक्कम हाेती. या बॅंक खात्याच्या रकमेतून मुलाचे विमान तिकीट काढल्यानंतर ते रद्द करून तिकिटाचे पैसे परत मिळण्याकरिता गुगलवर विमान कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर त्यांनी कॉल केला. यावेळी कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने बॅंक अकाऊंटची तसेच एटीएमची माहिती विचारल्यानंतर त्यांनीही माहिती दिली. त्यानंतर खात्यातील ५५ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचे त्यांना समजले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सायबर पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तपास सुरू केल्यानंतर दाेन टप्प्यात ही रक्कम काढल्याचा शाेध घेतला. तसेच फ्लिपकार्ट य एरॉन पेला ही रक्कम वळती झाल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले. सायबर पाेलिसांनी दाेन्ही कंपन्यांशी संपर्क साधून रक्कम परत करण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनीही प्रक्रिया पूर्ण करून रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सात ते २१ दिवसाच्या मध्ये ही रक्कम त्यांना परत मिळणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनखाली सायबर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक, दीपक सोळंके, अतुल अजने, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोगे यांनी केली आहे.

Web Title: Withdraw money from bank account get back within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.