पारडी येथे माकडाच्या हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:10+5:302021-06-30T04:13:10+5:30

बार्शिटाकळी तालुक्यातील पारडी येथे एका माकडाने हैदोस सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन ...

Woman injured in monkey attack at Pardi | पारडी येथे माकडाच्या हल्ल्यात महिला जखमी

पारडी येथे माकडाच्या हल्ल्यात महिला जखमी

Next

बार्शिटाकळी तालुक्यातील पारडी येथे एका माकडाने हैदोस सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच गजानन पाटील काकड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. गावात लहान मुलांवर हल्ला करणे, घरावर हैदोस घालणे, साहित्याची नासाडी करणे आदी प्रकार माकडाने सुरू केले आहेत. त्यामुळे माकडाचा हैदोस वाढल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. माकडाने गावातील कौसल्याबाई काकड यांना जखमी केले आहे. कौसल्याबाई काकड यांच्यासह कस्तुराबाई काकड, प्रगती उघडते, सुशीलाबाई काकड आदी महिलांवर माकडाने हल्ले करून जखमी केले आहे. याबाबत वनविभागाचे रेंजर डांगे यांना महिती देण्यात आली आहे. वन विभागाने माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गजानन पाटील काकड यांनी केली आहे.

Web Title: Woman injured in monkey attack at Pardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.