शेळगाव बोरमाळीच्या महिलांचा बीडीओ कार्यालयात ठिय्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:06+5:302021-02-13T04:19:06+5:30
बार्शीटाकळी: गावातून पोल्ट्री फार्म हटविण्याची मागणी करीत तालुक्यातील शेळगाव (बोरमाळी) येथील महिलांनी शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ...
बार्शीटाकळी: गावातून पोल्ट्री फार्म हटविण्याची मागणी करीत तालुक्यातील शेळगाव (बोरमाळी) येथील महिलांनी शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपासून गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन निदर्शने केली. यावेळी मागणी पूर्ण होईपर्यंत हटणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.
आंदोलनकर्त्यांच्या तक्रारीनुसार, तालुक्यातील शेलगाव (बोरमाळी) येथे कांता ब्रह्मदेव राठोड यांचे पोल्ट्री फार्म शाळा व अंगणवाडीजवळ आहे. पोल्ट्री फार्ममुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने महिला, पुरुष तसेच लहान मुलांना त्रास होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हा दंडाधिकारी, पालकमंत्र्यांकडे तक्रार दिली आहे. पालकमंत्र्यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. गावात समस्या जैसे थे असल्याने संतप्त महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. सदर वृत्त लिहिपर्यंत महिला व पुरुषांनी पंचायत समिती कार्यालय सोडले नव्हते.
या आंदोलनात माया जाधव, सुषमा जाधव, इंदुबाई राठोड, नर्मदाबाई जाधव, कविता जाधव, पूर्णाबाई पवार, करुणाबाई आडे, संगीता पवार, कमलाबाई राठोड, रेणुकाबाई जाधव, मीराबाई जाधव, सुषमाबाई पाटील, चंदकलाबाई पवार, लक्ष्मीबाई पवार, करुणाबाई पवार, मीराबाई चव्हाण आदी सहभागी झाले होते. ( फोटो)