लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जागतिक महिलादिनी खामगावात अभिनव आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला झुणका भाकरचा नैवैद्य दाखविला.गत काही दिवसांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात एकाच महिन्यात तीन-चारदा वाढ होत आहे. त्यामुळे गृहीणींचे बजेट कोलमडले असून, सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. यागोष्टीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्यावतीने नांदुरा रोडवरील गोसन्स् फ्यूल्स येथे सुरूवातीला चूल मांडो आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी चुली पेटवून झुणका भाकरचे रांदण केले. त्यानंतर झुणका भाकरेचा नैवैद्य दाखविला. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शनेही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, पक्ष निरिक्षक प्रकाश पाटील, करण्यात आलीत. यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष श्रीमती सरस्वती खासने , महिला काँग्रेस कमिटीच्या शहराआद्यक्षा सौ. सुरजीतकौर सलुजा, शहर उपाध्यक्षा सौ. मायाताई तिवारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वषार्ताई वनारे , श्रीमती सीमाताई ठाकर, नगरसेविका संगीता पाटील, पंचायत समिती सदस्या ज्योती सातव, नगरसेविका सौ शितल माळवदे, माजी नगरसेविका अर्चनाताई डुकरे, महिला काँग्रेसच्या संघटक पूजा वाघमारे, शारदा शर्मा, अश्विनी भोसले, सौ. स्मिताताई भोसले माटरगावच्या सरपंच सौ.राधाताई मिरगे, उपसरपंचा सौ. विद्या शेगोकार, पूनम मिरगे, सौ. शीतल वावटीकर, सौ.प्राजक्ता वावटीकर, सौ. रूपाली तांबटकार, सौ. सविता वानखडे,सौ. माया तायडे, सौ. संगीता वानखडे, वाडी ग्राम पंचायत सदस्या सौ. गीता नाईक, प्रतिभाताई कोलते, ग्राम पंचायत सदस्या सौ. शीतल सचिन ठाकरे, सौ. राधा टिकार, किरण यामावत, सविता आरवाडे, सौ. आशा जाधव, सौ. प्राजक्ता वावगे, सौ. भाग्यश्री निळे, सौ. प्रमिलाताई चोपडे, विमल तराळे , सविता कानडे, इंदूबाई सुलताने, सीमाताई निमकर्डे, सौ. विमलताई धोरण, सुरेश वनारे, सुरेश तोमर, तुषार चंदेल, काँग्रेस गटनेते अमेयकुमार सानंदा, मनिष देशमुख, विनोद मिरगे, श्रीकृष्ण मोरे, शुभम मिश्रा, नगरसेवक किशोरआप्पा भोसले आदींची उपस्थिती होती.