‘कृषी पदवीधरांसाठी स्टार्ट-अप संधी’ विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:12+5:302021-06-26T04:14:12+5:30
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अथिती म्हणून हैद्राबाद कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीचे संचालक डॉ. श्रीनिवास राव, विशिष्ट अथिती म्हणून राजस्थान ...
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अथिती म्हणून हैद्राबाद कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीचे संचालक डॉ. श्रीनिवास राव, विशिष्ट अथिती म्हणून राजस्थान येथील सीएसएस राष्ट्रीय कृषी विपणन संस्थेचे डॉ. रमेश मित्तल कार्यक्रमप्रसंगी झूम ॲपद्वारे जुडलेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, अधिष्ठाता डॉ. एस. बी. वडतकर ऑनलाइन जुडलेले होते. कार्यक्रमाचे आयोजन कुलसचिव डॉ. एस. आर. काळबांडे यांनी कृषी पदवीधरांसाठी केले होते. सूत्रसंचालन स्वाती नारनवरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश मुरुमकार यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. विवेक खांबलकर, महेंद्रसिंह राजपूत, सागर पाटील, अमरदीप डेरे व कृष्णदीप साहू तसेच सर्व कर्मचारी, कृषी विद्यापीठ संशोधन व उष्मायन संस्था व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.