आरजे प्रसन्न यांच्या सोबत प्रा. विशाल कोरडे यांनी दृष्टिदानाचे महत्त्व सांगितले. दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या जागतिक मंचावर वाशिम येथील डॉ. मंजुश्री जांभरुणकर यांनी नेत्रदान कसे करावे, त्याचे महत्त्व प्रस्थापित केले. डॉ. सारिका शहा, डॉ. नितीन उपाध्ये, डॉ. राजेंद्र मेंडकी, पारुल केजरीवाल, स्वाती झुनझुनवाला यांनी नेत्रदान जनजागृती यूट्युब चॅनलच्या माध्यमाने प्रस्तुत केली. रक्तदाता दिनानिमित्त राजश्री पाटील खामगाव यांनी रक्तदान का करावे, रक्त कमीमुळे होणारे आजार असे विविध विषय मांडले. डॉ. वैष्णवी गांधी, डॉ. जुगल चिराणीया, प्रज्ञा जोशी यांनी ऑनलाइन माध्यमाने रक्तदानाचे आवाहनदेखील केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनामिका देशपांडे, प्रसाद झाडे, राजश्री नाथक, श्रीकांत कोरडे, प्रीती सोनी, अनिरुद्ध देशपांडे, पूजा देशमुख, प्रांजल ढेंगे, हिमांशू निमकर्डे आदींनी सहकार्य केले.
जागतिक नेत्रदान व रक्तदाता दिन जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:26 AM