श्रीसंत गाडगेबाबा चषक : वाशिमच्या पहिलवानाने जिंकली चांदीची गदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:56 PM2019-06-02T12:56:41+5:302019-06-02T12:57:23+5:30
चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुल्या गटात वाशिमचा पहिलवान ज्ञानेश्वर गादेकर याने अकोल्याच्या नारायण नागे याच्यावर मात करीत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. १५ हजार रु . रोख पारितोषिकासह श्रीसंत गाडगेबाबा चषकावर आपले नाव कोरले.
अकोला: श्री संत गाडगेबाबा व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ अकोलाच्यावतीने ३० मे रोजी श्री संत गाडगेबाबा चषक विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुल्या गटात वाशिमचा पहिलवान ज्ञानेश्वर गादेकर याने अकोल्याच्या नारायण नागे याच्यावर मात करीत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. १५ हजार रु . रोख पारितोषिकासह श्रीसंत गाडगेबाबा चषकावर आपले नाव कोरले.
३५ किलो वजनगटात प्रेम श्रीनाथ, ४० किलो वृषभ गर्गे, ४५ किलो दिव सिरसाट, ५० किलो करण मलिये, ५५ किलो पंकज माकोडे, ६३ किलो गोविंद कपाडे, ७१ किलो वजनगटात अजय पकमोडे यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धा समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, नगरसेवक अनिल गरड, नगरसेवक सतीश ढगे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर गादेकर याला चांदीची गदा, गाडगेबाबा चषक आणि रोख १५ हजार रु . पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. नारायण नागे यालादेखील सन्मानित करण्यात आले. सर्व गटातील विजेता व उपविजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला जुन्या पिढीतील मल्ल रमेश मोहकार, बंडू चांदुरकर, रू पलाल मलिये, बल्लू बुलबुले, अब्दुला पहिलवान, विदर्भ केसरी नजीर पहिलवान, राजू भिरड, अनिल बिडवे, ओंकार मुळे, विजय नागलकर, किशोर औतकर, रतन इचे व विजय उजवणे उपस्थित होते. यावेळी सर्व पहिलवानांचा संत गाडगेबाबा व्यायामशाळेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी सत्कार केला. स्पर्धेत पंच म्हणून शिवा शिरसाट, महेंद्र मलिये, कुणाल माधवे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जयंत सरदेशपांडे, रवींद्र गोतमारे, राजेश नेरकर, गणेश माळी, किशोर अरू ळकर, गणेश श्रीनाथ, कैलास दामोदर, सतीश इंगळे, विष्णू अरू ळकर, दिगांबर दुतोंडे व आखाड्याचे मल्ल यांनी सहकार्य केले.