लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरगाव: कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवादही साधला. मासा गावातील शेतामध्ये बोंडअळीने उद्ध्वस्त केलेल्या कपाशी पिकाची पाहणी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. यावर्षी बोंडअळीने कपाशीवर आक्रमण केल्याने डोंगरगाव परिसरातील शेतकरी आर्थिक संकाटात सापडले आहेत. अत्यल्प पावसामुळे व रोगराईमुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही तसेच सोयाबीन हंगामाच्या काळात बाजारपेठेत सोयाबीनचे भाव कमी होते. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्याने लागलेला खर्चही निघाला नाही. नवीन कापसाच्या वाणावर रोगराई मोठय़ा प्रमाणात येत आहे. त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करण्यात मोठा खर्च होत आहे; मात्र बोंडअळीने नियंत्रणात येण्याऐवजी शेतकरीच संकटात पडला आहे. कापसाच्या मुहूर्तावर कापसाची वेचणी ही फेब्रुवारी ते मार्चपर्यंत चालत होती; मात्र आता डिसेंबरमध्ये कापूस वेचणी हंगाम संपुष्टात येत आहे. इत्यादी व्यथा येथील शेतकर्यांनी माजी मंत्री यशवंत सिन्हा यांना सांगितल्या. यावेळी दिलीप मोहोड, रवी पाटील अरबट, राजेश मंगळे ,एफएमसी संचालक, सतीश फाले, प्रमेश फाले, माजी सरपंच शरद फाले, विनोद फाले, बबन फाले, तुकाराम दहातोंडे, पो.पा. अगंत फाले, विनोद श. फाले, विक्की फाले मोठय़ा प्रमाणात शेतकरी यावेळी उपस्थित होते. फोटो
यशवंत सिन्हा यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:47 AM
कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवादही साधला.
ठळक मुद्देमासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची केली पाहणी यावेळी त्यांनी शेतकर्यांशीही साधला संवाद