अकोला : महाराष्ट्र (महाबीज)राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी ४.२५ लाख क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन केले आहे.त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंरतु लॉकडाऊन चा परिणाम अंशता जाणवत आहे.असे असले तरी एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्यात बियाण्याचे पीक प्रात्यक्षीक घेण्यात येणार आहे. राज्यात जे काही ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागते त्यात अर्धा वाटा हा महाबीजचा असतो.पंरतु गतवर्षी पावसाचा परिणाम सोयाबीन पिकावर झाल्याने कंपन्याकडून बियाण्यांची उपलब्धता कशी राहील सांगता येणार नाही; पंरतु महाबिजने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सरासरी बियाणे उपलब्ध करू न देण्याचे ठरवले आहे.महाबीज राज्याबाहेर बिजोत्पादन कार्यक्रम घेत असल्याने सद्या कच्चा माल महाबीजकडे उपलब्ध आहे. लॉकडाऊनमुळे नागपूर येथील बियाणे प्रक्रिया केंद्र बंद असले तरी चिखली,वाशिम,अकोला,हिगोंली येथील बियाणे प्रक्रियाचे काम सुुरू आहे. बियाणे प्रक्रिया झाल्यानंतर शासनाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते तसेच पीक प्रात्यक्षिक घेतल्यानंतरच ते बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करू न देण्यात येईल.१५ एप्रिलनंतर या कामाला आणखी गती येईल.त्यासाठी महाबीजने काम सुरू केले आहे.पंरतु लॉकडाऊन मुळे अधिकाऱ्यांची कार्यालयात ५ ते १० टक्के उपस्थिती निर्धारित केली आहे.त्यामुुळे वर्क फॉर होम काम सुरू आहे. हे कामही जोरात सुुरू असले तरी प्रत्यक्ष बियाणे प्रक्रियेसाठी मजुरांची जेवढी उपलब्धता हवी तेवढी नसल्याने अल्पसा परिणाम आहेच.पंरतु शेतकºयांना वेळेवर बियाणे पोहोचवले जाणार असल्याचे महाबीजने ठरवले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी शेतकºयांना सोयाबीन बियाणे वेळेवर उपलब्ध करू न देण्याचा प्रयत्न आहे.
- प्रफ्फुल लहाने, महाव्यवस्थापक प्रक्रियामहाबीज,अकोला.