अकोल्यातील युवा नेत्रतज्ज्ञाच्या ऑटोमॅटिक टाका मारण्याच्या यंत्राला पेटंट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:18+5:302021-05-09T04:19:18+5:30
उपकरणामुळे शत्रक्रिया होईल सोपी! पारंपरिक रेटिना शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर, बुब्बुळापासून डोळ्याच्या मागील भागात उपकरणाद्वारे ठरावीक अंतरावर तीन-चार चिरे ...
उपकरणामुळे शत्रक्रिया होईल सोपी!
पारंपरिक रेटिना शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर, बुब्बुळापासून डोळ्याच्या मागील भागात उपकरणाद्वारे ठरावीक अंतरावर तीन-चार चिरे मारण्यात येतात. त्यासाठी चिरे मारलेल्या भागाला प्रत्येकी एक टाका द्यावा. टाका दिल्यानंतर टाके बरे व्हायला ४०-४५ दिवस लागतात. दरम्यान, रुग्णांना अनेक समस्या उद्भवतात. या संशोधित उपकरणामुळे घेतलेला टाका आतमध्ये घेतला जाणार व डोळ्याच्या बाहेर उघडा राहणार नाही. त्यामुळे रुग्णाला डोळा लाल होणे, पाणी येणे, रक्तस्त्राव होणे, टाक्याच्या जागी गाठ होणे, जंतुसंसर्ग होणे आदी त्रास होणार नाही. रुग्ण ३-४ दिवसांत टाक्यांपासून मुक्त होईल.
डॉक्टरांना होईल मदत
डॉक्टरांच्या बाजूने पाहिलेतर पारंपरिक टाके मारण्यासाठीसुद्धा कौशल्य, निपुणता लागते. कितीही मोठा सर्जन असला तरी त्यालासुद्धा ३-४ टाके मारायला ८-१२ मिनिटे लागतात. या संशोधित उपकरणामुळे नवीन सर्जनसुद्धा गुंतागुतींची शस्त्रक्रिया सहजरीत्या करू शकेल आणि त्याचाही वेळही वाचेल.
रेटिना सर्जरीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ए डिवाइस फॉर स्क्लेरोटॉमी सुटुरिंग या उपकरणावर यशस्वी संशोधन केले. त्याला यश मिळाले आहे. केंद्र शासनाने संशोधनाला मान्यता देत, पेटंटला मंजुरी दिली आहे. या संशोधन व उपकरणामुळे नेत्र रुग्णांचा त्रास कमी होईल व नेत्रतज्ज्ञांचा वेळ वाचेल.
-डॉ. सुनील मोतीराम भड, नेत्ररोगतज्ज्ञ