जिल्हा परिषद शाळांच्या ४५५ शिकस्त वर्गखोल्या पाडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:01 AM2020-09-16T11:01:45+5:302020-09-16T11:01:51+5:30
नवीन वर्गखोल्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदमार्फत जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) निधीची मागणी करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २०६ शाळांच्या शिकस्त ४५५ वर्गखोल्या पाडण्यात येणार असून, नवीन वर्गखोल्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदमार्फत जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) निधीची मागणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०६ प्राथमिक शाळांच्या ४५५ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. शाळांच्या शिकस्त झालेल्या वर्गखोल्या पडण्यास जिल्हा परिषदेच्या १४ सप्टेंबर रोजी झालेल्या आॅनलाइन सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त वर्गखोल्या पाडण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असून, नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदमार्फत जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी दिली.