जिल्हा परिषद निवडणूक : अनेकांना डच्चू; बंडोबाही रिंगणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:13 PM2019-12-24T12:13:33+5:302019-12-24T12:13:40+5:30

दोन्ही पक्षांनी करून घेत आयत्यावेळी उमेदवारी वाटप करून रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न जोरकसपणे केल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले.

Zilla Parishad Elections: Many candidates dropped ; Rebels in Election arena | जिल्हा परिषद निवडणूक : अनेकांना डच्चू; बंडोबाही रिंगणात!

जिल्हा परिषद निवडणूक : अनेकांना डच्चू; बंडोबाही रिंगणात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद निवडणुकीत स्वपक्षाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची संधी आपसूकच मिळाली आहे. त्याचा फायदाही या दोन्ही पक्षांनी करून घेत आयत्यावेळी उमेदवारी वाटप करून रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न जोरकसपणे केल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले. त्याचवेळी जिल्ह्यात महाविकास आघाडीचा छोटासा प्रयत्न म्हणून मूर्तिजापूर तालुक्यातील तीन जागा शिवसेनेसाठी ठेवल्याचेही यादीत नमूद केले आहे. पक्षाचे पदाधिकारी सुनील धाबेकर, डॉ. संजीवनी बिहाडे, हेमंत देशमुख यांनाही उमेदवारी दिली. सोबतच गतकाळात भाजपमध्ये दाखल झालेले उदय देशमुख यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद गटात उमेदवारांची यादी जाहीर केली.
त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील दानापूर गटातून शीला श्रीकृष्ण राहाणे, हिवरखेड- सविता नितीनकुमार भोपळे, अडगाव बुद्रूक- अफसाना बी शे. राजीक, तळेगाव बुद्रूक- सुनंदा सुरेश गिºहे, पाथर्डी- डॉ. संजीवनी अशोक बिहाडे, दहीगाव- वनिता गजानन लासुरकर, भांबेरी- राष्ट्रवादी.
अकोट तालुक्यातील उमरा गटातून बाळकृष्ण विश्वनाथ बोंद्रे, अकोलखेड- गजानन गोविंदराव डाफे, अकोली जहागीर- सुकेशिनी अनिल ठाकरे, कुटासा- ज्योती उदय देशमुख, चोहोट्टा, आसेगाव बाजार, मुंडगाव, वरूर गटात उमेदवार नाहीत.
अकोला तालुक्यातील दहीहांडा गटात हेमंत कृष्णराव देशमुख, उगवा- दिनकर ओंकार वाघ, बाभूळगाव- मनीषा उल्हास सरदार, बोरगाव मंजू- सुवर्णकला कैलास बागडे, चांदूर- शीला प्रमोद वानखडे, चिखलगाव- राष्ट्रवादी, कुरणखेड, घुसर, कानशिवणी उमेदवार नाहीत.
बाळापूर तालुक्यातील हातरूण गटात रसिका ब्रम्हदेव इंगळे, पारस- सुनीता सुबोध पातोंड, देगाव- पंढरी सुखदेव हाडोळे, वाडेगाव- चंद्रशेखर दौलतराव चिंचोळकर.
पातूर तालुक्यातील चोंढी गटात शीतल मंगेश डाखोरे, विवरा- समाधान बालचंद्र राठोड, सस्ती- सुनंदा वासुदेव डोलारे, पिंपळखुटा- बबन नथ्थूजी देवकर, आलेगाव- अर्चना प्रमोद राऊत.
बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना गटातून गोविंदा उकंडा तिवले, महान- सुनंदा संदीप झळके, राजंदा- प्रकाश पांडुरंग खाडे, जांब वसू- सुनील केशवराव पाटील (धाबेकर). कान्हेरी सरप, दगडपारवा, पिंजर गटात उमेदवार नाहीत.
मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव गटातून शिवसेना, कानडी- शिवसेना, लाखपुरी, बपोरी, कुरूम, माना, सिरसो गटात उमेदवार नाहीत.

Web Title: Zilla Parishad Elections: Many candidates dropped ; Rebels in Election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.