अकोला: जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने देयक अदा करताना पैसे घेऊ नये, अशी ताकीद देतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोशागार कार्यालयातही पैसे न देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत शुक्रवारी दिला. त्याची नोंद बैठकीच्या इतिवृत्तात घेण्यात आली. त्याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा कोशागार कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी बिथरले. लोकमतच्या वृत्ताचे कात्रण कार्यालयात लावत त्यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश बंदच्या सूचना दिल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शीपणा आणण्यासाठी विभागप्रमुख, गटविकास अधिकाºयांना खास सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये अर्थ विभागाला दिलेल्या निर्देशानुसार देयक काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी एक रुपयाही घेऊ नये, जिल्हा कोशागार अधिकारी कार्यालयातही पैसे दिले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याची नोंद बैठकीच्या इतिवृत्तात आहे. सोबतच अर्थ विभागात कोणत्याही देयकातील त्रुटी एकदाच काढल्या जातील. वारंवार त्रुटी काढण्यावर बंदी आणण्यात आली. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाले. त्यावर जिल्हा कोशागार अधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाºयांची सकाळीच बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर लोकमतच्या वृत्ताचे कात्रण कार्यालयात लावण्यात आले. सोबतच जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना कार्यालयात कामासाठी प्रवेश बंदची फलकेही लावण्यात आली. या प्रकाराने शासनाच्या दोन विभागातील शाब्दिक खेळ आता कोणते वळण घेईल, हे येणारा काळच सांगणार आहे.