जिल्हा परिषदेचा गृहपाठ कच्चा; पीआरसी मुद्यावर कारवाई, साक्ष पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:35 PM2018-04-30T13:35:28+5:302018-04-30T13:35:28+5:30

अकोला : जिल्हा परिषदेच्या कारभाराचा धांडोळा घेतल्यानंतर त्यात दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई, अपहारित रकमांची वसुली, दंडात्मक कारवाईसाठी दिलेल्या मुद्यांनुसार कारवाई करण्यात जिल्हा प्रशासनाने कुचराई केल्याचे पुढे येत आहे.

Zilla Parishad Homework; Action on the PRC issue, postponed the testimony | जिल्हा परिषदेचा गृहपाठ कच्चा; पीआरसी मुद्यावर कारवाई, साक्ष पुढे ढकलली

जिल्हा परिषदेचा गृहपाठ कच्चा; पीआरसी मुद्यावर कारवाई, साक्ष पुढे ढकलली

Next
ठळक मुद्देविधिमंडळाच्या पंचायत राज समितीने गेल्यावर्षी १ ते ३ जूनदरम्यान जिल्हा परिषदेची तपासणी केली होती. जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांचा दौरा करत विविध प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते.अनुपालनाची माहिती अर्धवट असल्याने ती समितीपुढे कशी ठेवावी, या मुद्यावरूनच आता अधिकारी धास्तावले आहेत.


अकोला : जिल्हा परिषदेच्या कारभाराचा धांडोळा घेतल्यानंतर त्यात दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई, अपहारित रकमांची वसुली, दंडात्मक कारवाईसाठी दिलेल्या मुद्यांनुसार कारवाई करण्यात जिल्हा प्रशासनाने कुचराई केल्याचे पुढे येत आहे. कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करताना तोंडघशी पडण्याऐवजी गृहपाठ पक्का झाल्यानंतरच पंचायत राज समितीने साक्ष घ्यावी, या मतावर अधिकारी आले. त्यामुळे आधी ठरलेल्या कार्यक्रमाऐवजी आता २९ व ३० मे रोजी अधिकाºयांची साक्ष होणार असल्याची माहिती आहे.
विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने गेल्यावर्षी १ ते ३ जूनदरम्यान जिल्हा परिषदेची तपासणी केली होती. त्यावेळी सन २००८-०९ आणि २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखा परीक्षण अहवालातील गंभीर मुद्यांवर जिल्हा परिषदेने केलेल्या कारवाईची माहिती समितीने घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांचा दौरा करत विविध प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यावेळी लेखा परीक्षण अहवालानुसार अपहारित रक्कम, गैरव्यवहारांची रक्कम तसेच काही प्रकरणात दंडाची वसुली करण्याचे आदेश समितीने दिले. ती रक्कम प्रचंड असताना जिल्हा परिषदेने ३० कोटी रुपये वसूल केल्याची माहिती आहे. तसेच ३० ते ३२ प्रकरणात अधिकारी-कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाईचेही निर्देश दिले होते. त्यावरही काहींना नोटीस देत त्यांची स्पष्टीकरणे मागवण्यात आली. त्यावर कोणतीच कारवाई न करता ती तशीच अनुपालन अहवालात जोडण्यात आली. त्यातून समितीने दिलेल्या निर्देशांचे पूर्णपणे अनुपालन झालेच नाही. अनुपालनाची माहिती अर्धवट असल्याने ती समितीपुढे कशी ठेवावी, या मुद्यावरूनच आता अधिकारी धास्तावले आहेत.
- नियमित अधिकारी नसल्याची सबब
पंचायत राज समितीपुढे ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हा परिषद अधिकारी, विभागप्रमुखांची साक्ष २ व ३ मे रोजी घेण्याचे ठरले. मात्र, जिल्हा परिषदेला नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांची बदली झाली आहे. या परिस्थितीत वसुली, प्रशासकीय कारवाई करणे शक्य नाही. त्यासाठी वेळ लागेल, अशी सबब सांगत जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकाºयांची साक्ष पुढे ढकलण्याची विनंती केल्याची माहिती आहे. त्यानुसार समितीने २९ व ३० मे रोजी साक्ष घेण्याची तयारी केल्याची माहिती आहे.

अनेक प्रकरणातील कारवाई थंड बस्त्यात
जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत राज समितीने दिलेल्या निर्देशानुसार कारवाईच केली नसल्याची माहिती आहे. अधिकारी-कर्मचाºयांना वाचवण्याच्या नादात आता समितीपुढे तोंडघशी पडण्याची वेळ येणार आहे. त्यावर आता सारवासारव करण्यासाठी साक्ष पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली.
- अधिकाºयांवर अविश्वास
पंचायत राज समितीच्या दौºयाच्या वेळी जिल्हा परिषदेच्या काही अधिकाºयांनी स्वत:चे उखळ पांढरे केल्याची चर्चा आहे. त्यावेळी कासावीस झालेल्या अधिकारी-कर्मचाºयांनी आता संबंधित अधिकाºयाला न जुमानण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे समितीपुढे साक्ष देताना कारवाई न केल्याची जबाबदारी कोण घेणार, यासाठीच टाळाटाळ सुरू असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Zilla Parishad Homework; Action on the PRC issue, postponed the testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.