अन्यायग्रस्त उर्दू शिक्षकांचे समुपदेशन तात्काळ करण्याचे जिल्हा परिषदेला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:01+5:302021-01-24T04:09:01+5:30
राज्य ऊर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए. गफ्फार, राज्य प्रवक्ता सय्यद जव्वाद हुसेन व विदर्भ प्रमुख नईम ...
राज्य ऊर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए. गफ्फार, राज्य प्रवक्ता सय्यद जव्वाद हुसेन व विदर्भ प्रमुख नईम फराज यांनी सर्व उर्दू शिक्षकांना रुजू करून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आदेश देण्याची मागणी केली; परंतु कार्यवाही करण्यात न आल्यामुळे पुन्हा संघटनेने २६ नोव्हेंबर रोजी ना. मुश्रीफ यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. आमदार नितीन देशमुख यांनी ना. हसन मुश्रीफ यांना विनंती करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ), उपायुक्त, उपायुक्त मागासवर्ग * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *कक्ष विभागीय कार्यालय अमरावती यांची मंत्रालयात बैठक आयोजित करून १२ उर्दू शिक्षकांची समस्या सोडविण्याची मागणी केली. ५ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी सौरभ कटियार, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग व इतर अधिकाऱ्यांसह ग्राम विकास विभागाचे उपसचिव, * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *कक्ष अधिकारी यांच्या बैठकीत सविस्तर चर्चेअंती मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना १२ उर्दू शिक्षकांना तात्काळ रुजू करून घेण्यास व नियमबाह्य केलेला ८ उर्दू शिक्षकांचा दुरुस्ती समायोजन करण्याचे आदेश दिले. यासाठी राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए. गफ्फार सय्यद, राज्य प्रवक्ता जव्वाद हुसेन, विदर्भ प्रमुख नईम फराज यांनी वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा केला. अखेर अन्यायग्रस्त शिक्षकांना समुपदेशनाने रुजू करून घेण्याचे पत्र २१ जानेवारीला * * * * * * * * * * * * * * *कक्ष अधिकारी ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांनी दिले आहेत. तसेच वेतन व भत्ते अदा करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले.